loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर हायस्कुलमध्ये गावठी आठवडा बाजाराचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) - कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातर्फे दि. ८ जानेवारी रोजी प्रशालेच्या मैदानात सकाळी ८. ३० वा. गावठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात पिकवली जाणारी विविध धान्य तसेच तयार होणारी विविध उत्पादने यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान, विक्री कौशल्य विकसित व्हावे व त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने या गावठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बाजारात विविध गावठी वस्तू, धान्ये, खाद्यपदार्थ, भाज्या व इतर वस्तू विद्यार्थ्यांकडून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच वराडकर हायस्कुलच्या स्काऊट गाईड विभागामार्फत आयोजित विद्यार्थी खरी कमाई स्टॉलमध्ये विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. या गावठी आठवडी बाजारात कट्टा परिसरातील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालकांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष खरेदी करून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg