loader
Breaking News
Breaking News
Foto

दीप्ती दवे मेमोरियल जिल्हास्तरीय टेबलटेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत मालवणच्या ईशांत वेंगुर्लेकरला दुहेरी मुकुट

मालवण (प्रतिनिधी) - महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोरगांवकर मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण येथील श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हॉलमध्ये दीप्ती दवे मेमोरियल टेबल टेनिस चॅम्पियनशिप जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मालवण,कणकवली, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी येथील ३८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मालवणच्या ईशांत वेंगुर्लेकरने दोन गटात विजेतेपद मिळवीत दुहेरी यश मिळविले. मालवण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विजय कामत व विश्वस्त दिगंबर सामंत यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रारंभी मालवणच्या टेबल टेनिसचे आधारस्तंभ व शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणारे बाळासाहेब पंतवालावलकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकातील टेबल टेनिस चळवळीच्या प्रणेत्या जयश्री खानोलकर-सामंत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा १३ वर्षांखालील मुली-मुलगे, १७ वर्षांखालील मुली-मुलगे, पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी अशा एकूण पाच गटांमध्ये संपन्न झाली. या टेबल टेनिस स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- १७ वर्षांखालील मुली-मुलगे विजेती वीरा वारंग व उपविजेती प्रतिभा परुळेकर, १७ वर्षांखालील मुली-मुलगे - विजेता लौकिक तळवडेकर व उपविजेती आर्या दिघे, महिला एकेरी विजेती वर्षा परुळेकर व उपविजेती आर्या दिघे, पुरुष-महिला दुहेरी विजेते- ईशांत वेंगुर्लेकर व चंद्रकांत साळवे आणि उपविजेते अधिश पेडणेकर व लौकिक तळवडेकर आणि पुरुष एकेरी विजेता व स्पर्धेचा चॅम्पियन मालवणचा ईशांत वेंगुर्लेकर ठरला तर उपविजेतेपद सावंतवाडीच्या राजाराम वालावलकर याला प्राप्त झाले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना मालवण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त दिगंबर उर्फ काका सामंत आणि डॉ. अश्विन दिघे यांच्याहस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. उपांत्य सामन्यांमध्ये पोहोचलेल्या धनश्री परब, गौरेश घाडीगावकर, रौनक कांबळी, प्राची चव्हाण, पंकज तुळसुलकर, अतुल गवस, शुभम मुळीक या स्पर्धकांनाही चषक देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी इंडियन ऑइलचे सेवानिवृत्त अधिकारी उदय बेडेकर आणि अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल मालवणच्या माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विलास परुळेकर, पावनी मालनकर, योगेश परुळेकर, वर्षा परुळेकर, आर्या दिघे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संपूर्ण व्यवस्थापन महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन सिंधुदुर्गचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर, सचिव हेमंत वालकर, खेळाडू लौकिक तळवडेकर, अधिश पेडणेकर यांनी केले. स्पर्धेसाठी दिलीप हुनारी, शुभम मुळीक, पराग चव्हाण, सुजन परब, नितीन तळेकर, नितीन परुळेकर, श्यामसुंदर वारंग, मेघना वारंग, उमा दिघे, प्रशांत परब इत्यादी मान्यवर व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेच्या सामन्यांचे संयोजन व सूत्रसंचालन सचिव हेमंत वालकर यांनी केले, तर अध्यक्ष विष्णू कोरगांवकर यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg