पोरबंदर मुंबई :- भारतीय नौदलाने प्राचीन जहाज बांधणी शास्त्रानुसार केरळमधील सुप्रसिद्ध नौका रचनाकार बाबु शंकरन यांच्या नेतृत्वाखाली कारवार बंदरातील नौदल तळावर बनवीलेली आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य ही शिडाची नौका आपल्या पहिल्या लांबच्या सागरी प्रवासाला रवाना झाली. पोरबंदर ते मस्कत (ओमान) आणि परत कारवार या प्रवासासाठी सोमवार २९ डिसेंबर रोजी शानदार आणि भव्य लष्करी समारंभाने निघाली. याद्वारे भारताचा पश्चिम किनारा आणि ओमान यांना जोडणाऱ्या सागरी मार्गाचा आढावा घेण्यात येणार आहे. ही नौका ओमानपर्यंतचा १४०० किलोमीटरचा प्रवास १५ दिवसांत पूर्ण करून ओमानला पोहोचणार आहे. भारताचा पश्चिम किनारा आणि प्राचीन सागरी मार्गामुळे हिंदी महासागर क्षेत्रात व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मीळाली होती. आता या आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य मोहिमेमुळे भारत आणि ओमानमधील संबंध दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्या अगोदर नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांनी नौकेला नौदलाचा झेंडा दाखवून सागरी मोहिमेवर रवाना केले. याप्रसंगी ओमानचे राजदूत इस्सा सालेह अल शिबानी हे सुद्धा उपस्थित होते.
कर्नाटकातील कारवार तळावर २१ मे २०२५ रोजी आय.एन.एस.व्ही.कौंडिण्य नौदलात दाखल झाली होती. ही नौका म्हणजे हिंदुस्थानच्या प्राचीन आणि समृद्ध अशा सागरी वारशाचे प्रतीक आहे. हा वारसा जपणे व त्याचे पुनरूत्थान करण्याचा प्रयत्न या नौका नयनाच्या माध्यमांतून करण्यात आला आहे. या नौका बांधणीसाठी कोणताही आराखडा किंवा अवशेष उपलब्ध नसताना बाबू शंकरन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे दिव्य पार पाडले आहे. अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे लागले. त्यामध्ये पुरातत्त्व शास्त्रज्ञ, नौदल रचनाकार, पाण्यातील चाचणी तज्ञ आणि कारागिरांचा उल्लेख करावा लागेल असे नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
"आय.एन.एस.व्ही. कौंडिण्य"ही नौका अजंठा लेण्यातील भित्तीचित्रावर आधारित आहे. पाचव्या शतकामध्ये अशा नौका वापरात होत्या.प्राचीन काळात उत्कृष्ट नौकानयनपटू कौंडिण्य यांनी मोठा प्रवास केला होता.त्याकाळी सागरी शक्ती म्हणून भारताचा लौकिक होता. काथ्या,नारळाच्या शेंड्या आणि जलरोधासाठी नैसर्गिक राळ यांचा वापर करून लाकडी फळ्यांची बांधणी. लाबी-६५ फूट, प्रवासी क्षमता-१८, बांधणी-दोरीने फळ्या शिवण्याचे तंत्र (स्टिच-फ्लॅंक) या नौकेच्या निर्मितीत एकही स्क्रू आणि पोलाद वापरले नाही. "आय.एन.एस.व्ही.कौंडिन्य" या नौकेसाठी लागणारे १७ दर्यावर्दी हे भारतीय नौदलाच्या वेगवेगळ्या विभागातील तज्ञ असून त्यामध्ये सध्या रायगडमध्ये वास्तव्यास असणारे आणि मूळचे सातारा जिल्ह्यातील ढोरोशी गावचे सुपुत्र अभिषेक मगर यांचाही समावेश आहे. अभिषेक मगर हे वयाच्या २० व्या वर्षी भारतीय नौदलात दाखल झाले असून गेल्या १७ वर्षांपासून त्यांचे वास्तव्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात खारघर येथे आहे.ते मुळचे सातारा जिल्ह्यातील ढोरोशी गावचे सुपुत्र आहेत.त्यांचा जन्म ९ मार्च १९९७ रोजी मुंबईतील कांदिवली या उपनगरात झाला असून बालवाडीपर्यंत ते तेथेच शिकले. तर इयत्ता ६ वी पर्यंत मूळ गावी पाटण तालुक्यातील ढोरोशी येथील जिल्हा परिषद शाळा नंतर खारघरमधील सुधागड एज्युकेशनच्या कोपरा हायस्कूल, १० वी नंतर खारघरमधील रामशेठ ठाकूर ज्युनिअर कॉलेज आणि शेवटी भारती विद्यापीठात इंजिनिअरींग करून नौदलाच्या स्पर्धा परिक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन भारतीय नौदलात दाखल झाले. गेल्या ९ वर्षांपासून नौदलाच्या वेगवेगळ्या शाखेत वेगवेगळ्या हुद्द्यावरती ते देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत.









































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.