loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात बालआनंद मेळावा, आमदार किरण सामंत यांचा वाढदिवस साजरा

रत्नागिरी - रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्रीराम मंदिरात आ. किरण तथा भैय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसाचे पूर्वसंध्येला ‘बाल आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी छोट्या बालकांची एकच गर्दी उसळली आणि मंदिराचा सारा परिसर छोट्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला. यावेळी देवी तुळजाभवानीची स्वहस्ते ओटी भरताना सौ. वर्षा किरण सामंत, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, रत्नागिरीच्या नगरसेविका सौ. पूजा पवार, सौ. संजीवनी जामखेडकर मॅडम आणि देवस्थानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर आदींनी सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीराम मंदिर देवस्थानच्या वतीने आ. किरण सामंत यांच्या सौभाग्यवती सौ. वर्षा किरण सामंत व रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांचा देवस्थानच्या अध्यक्षा सौ.उर्मिलाताई घोसाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी श्री. विनायक हातखंबकर सर, श्री. दिपक राऊत, श्री. राजन शेट्ये, नगरसेविका सौ. पूजा पवार, डॉ. दिलीप पाखरे, श्री. दिपक पवार, श्री. दिपक देसाई, श्री. संतोष रेडीज, श्री. राकेश चव्हाण, श्री. सुनिल नलावडे, श्री. प्रकाशशेठ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून सौ. वर्षा किरण सामंत, नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, नगरसेविका सौ. पूजा पवार, देवस्थानच्या मानकरी व नगरसेविका सौ. सायली पाटील, ज्येष्ठ नगरसेवक श्री. राजन शेट्ये, श्री. सुधाकरराव सावंत, डॉ. दिलीप पाखरे, श्री. नित्यानंद दळवी, देवस्थानचे विश्‍वस्त श्री. दिपकशेठ पवार, श्री. दिपक राऊत, श्री. संतोष रेडीज, श्री. राकेश चव्हाण, श्री. सुनिल नलावडे, श्री. प्रकाश जैन आदींनी शुभेच्छा दिल्या. या बालआनंद मेळाव्याला बालकांची गर्दी होतीच पण आबालवृद्धांनी सहभाग घेतल्याने खर्‍या अर्थाने आनंद मेळावा यशस्वी झाल्याचे म्हटले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg