loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात भव्य हेल्मेट जनजागृती रॅली

​रत्नागिरी (प्रतिनिधी) - वाढते रस्ते अपघात आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन, रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शहरात भव्य 'हेल्मेट जनजागृती रॅली' उत्साहात पार पडली. या रॅलीच्या माध्यमातून सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विशेष म्हणजे, या उपक्रमांतर्गत समाजातील ज्येष्ठ नागरिकांना हेल्मेटचे मोफत वितरण करून सुरक्षिततेचा संदेश देण्यात आला. ​या रॅलीला पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव, ऋषिकेश कराने, गजानन कुळी आणि केतन पाटील यांनी रॅलीचे नियोजन व संचलन केले.​कार्यक्रमाच्या विशेष सत्रात, रस्त्यावरील सुरक्षिततेचे गांभीर्य ओळखून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. "सुरक्षा ही केवळ तरुणांसाठीच नाही, तर प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी अनिवार्य आहे," असे मत यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आनंद शिंदे, अवधूत कुंभार, अक्षय पाटील आणि दिनेश शर्मा यांच्यासह आरटीओ विभागाचे व पोलीस दलाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टाइम्स स्पेशल

या जनजागृती मोहिमेत केवळ शासकीय विभागच नव्हे, तर ​शहरातील नागरिक विविध कार्यालयांचे कर्मचारी ​मोटार सायकल डीलर्सचे प्रतिनिधी ​यांनीही आपल्या दुचाकींसह सहभाग नोंदवला. 'हेल्मेट वापरा, जीव वाचवा' अशा घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला होता. ​पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी नागरिकांना आवाहन केले की, हेल्मेट हे केवळ दंडापासून वाचण्यासाठी नसून ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आहे. दुचाकी चालवताना आयएसआय (ISI) मार्क असलेले दर्जेदार हेल्मेट वापरणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg