loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार किरण सामंत यांची पंचायत समिती गणनिहाय बैठकींना सुरुवात

लांजा (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी पंचायत समिती गणनिहाय बैठकींना सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांची तयारी अधिक बळकट करण्यासाठी पक्ष संघटन व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर देण्यात येत आहे. या बैठकीदरम्यान आमदार किरण सामंत यांनी सर्व कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच प्रत्येकाने आपल्या गणात सक्रियपणे कामाला लागावे. संघटन मजबूत करणे, मतदारांशी थेट संपर्क वाढवणे, तसेच स्थानिक प्रश्नांची माहिती गोळा करून त्यावर उपाययोजना सुचवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, निवडणूक काळात शिस्तबद्ध व समन्वयाने काम करण्याचे आवाहन करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. प्रत्येक गणात जबाबदाऱ्या निश्चित करून प्रचाराची रूपरेषा ठरवण्यावर बैठकीत चर्चा झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गणनिहाय बैठकींमुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीला वेग येईल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. निवडणुका या कोणत्याही समाज किंवा जातीसाठी नसून त्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असतात, असे स्पष्ट मत आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले. शिवसेना ही नेहमीच सर्वसमावेशक विचारसरणी घेऊन काम करत असून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासासाठी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी आमदार सामंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणूक ही समाजात तेढ निर्माण करण्यासाठी नसून जनतेचा विश्वास संपादन करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी असते. शिवसेनेची ओळख ही कामातून आणि जनतेशी असलेल्या नात्यातून आहे. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याने जात-पात, भेदभाव बाजूला ठेवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे. विकासकामे, शासकीय योजना आणि स्थानिक प्रश्न याबाबत जनतेशी संवाद साधून विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचे, तसेच निवडणुकीपूर्वीच सक्रियपणे कामाला लागण्याचे आवाहन आमदार किरण सामंत यांनी केले. शिवसेना ही जनतेच्या सेवेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, संदीप दळवी, एस. एन. कांबळे, मुन्ना खामकर, प्रसाद माने, चेतन खंदारे, मानसी आंबेकर, गणेश लाखन, विभाग प्रमुख दादा पत्की, अनुष्का कातकर, तसेच सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख महिला शाखा प्रमुख, युवासेना पदाधिकारी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg