loader
Breaking News
Breaking News
Foto

गणपतीपुळे येथे आज अंगारकी चतुर्थी यात्रा

रत्नागिरी (वार्ताहर): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवार ६ जानेवारी रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावात साजरा होणार आहे. गणपतीपुळे येथील देवस्थान समितीच्या वतीने या यात्रोत्सवाचे अतिशय चोख नियोजन करण्यात आले असून अंगारकीच्या पार्श्वभूमीवर स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे ३.३० वाजता खुले होणार असून प्रारंभी गणपती मंदिराच्या मुख्य पुजारी अमित प्रज्ञा प्रभाकर घनवटकर यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मंदिर आणि देवबाग परिसरात देवस्थान समितीकडून अतिशय योग्य प्रकारच्या दर्शन रांगा उभारण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवीन वर्षातील पहिल्या अंगारकीचा योग जुळून आल्याने स्वयंभू श्रींच्या दर्शनासाठी घाटमाथ्यावरील कोल्हापूर सांगली, सातारा, सोलापूर, इचलकरंजी, मिरज, कराड, इस्लामपूर, कवठेमहांकाळ, हातकणंगले आदी ठिकाणाहून हजारो संख्येने भाविक दाखल होणार आहेत. यंदाच्या २०२६ च्या नववर्षातील हा पहिला अंगारकी चा योग जुळून आल्याने नववर्षातील नवनवे संकल्प आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वास जाण्यासाठी श्रींच्या समोर प्रार्थना करण्यासाठी घाटमाथ्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून भाविकांच्या गर्दीचा मोठा जनसागर उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे

टाइम्स स्पेशल

या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ४.३० वाजता देवस्थान समितीकडून स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक मंदिराच्या प्रदक्षिणामार्गे ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत व फटाक्यांच्या आतषबाजीत आणि मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात काढण्यात येणार आहे. तसेच अंगारकीच्या पार्श्वभूमीवर पहाटे ३.३० वाजल्यापासून रात्री १०.३० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg