loader
Breaking News
Breaking News
Foto

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला

खेड (दिलीप देवळेकर) : गृहराज्य मंत्री श्री योगेश कदम यांनी आज खेड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. योगिता दंत महाविद्यालय, येथे पार पडलेल्या या बैठकीदरम्यान सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी अभिनंदन केले. यावेळी खेड नगरपरिषद हद्दीतील विविध नागरी समस्या आणि शहर विकासाशी संबंधित विषयांवर सविस्तर व सखोल चर्चा करण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था, अंतर्गत रस्त्यांची अवस्था, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा तसेच शिक्षणाशी निगडित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागरिकांना भेडसावणार्‍या मूलभूत समस्यांचे तातडीने निराकरण करण्यावर भर देण्यात आला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट प्राधान्यक्रम निश्चित करून टप्प्याटप्प्याने विकासकामे राबविण्याचे निर्देश दिले. लोकाभिमुख प्रशासन, पारदर्शक व जबाबदार कारभार तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण होईल, यासाठी नगरपरिषद व प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ही बैठक खेड शहराच्या भावी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून, नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम व गतिमान होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. दिनांक ५ जानेवारी रोजी पार पडलेल्या या बैठकीमुळे खेड नगरपरिषदेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg