loader
Breaking News
Breaking News
Foto

जनसेवा निधीचे कार्य निरपेक्ष - अच्युत सावंत भोसले

बांदा (प्रतिनिधी) - जनसेवा निधी ही समर्पित वृत्तीने कार्य करणारी संस्था आहे. कै. डॉ द. भि. खानोलकर यांचे अलौकिक कार्य व त्यांची शिकवण खानोलकर परिवाराच्या तीन पिढ्यांकडून अविरत जोपासली जात आहे. जनसेवा निधी बांदा ही आदर्श व गुरूतुल्य लोकांची संस्था आहे. प्रस्ताव न मागवता स्वत: शोध घेऊन देण्यात येणारे हे पुरस्कार मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. तसेच अशा पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षस्थान लाभणे हेही माझे सदभाग्यच मानतो. या सोहळ्यात संस्थेचे पदाधिकारी व सदस्य स्वत: व्यासपीठावर न बसता खाली नियोजनाचे काम करतात यातून त्यांच्या निरपेक्ष कामाची प्रचिती येते, असे प्रतिपादन श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी-भोसले नॉलेज सीटी सावंतवाडी चे संस्थापक व कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी बांदा येथे केले. जनसेवा निधी बांदा या संस्थेचा ३७ वा आदर्श पुरस्कार वितरण सोहळा पिएमश्री केंद्र शाळा बांदाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सर्व पुरस्कार प्राप्त सत्कारमुर्ती उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते कै. डॉ. द. भि. खानोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावर्षीचा आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार सीमा दिपक पंडित (श्री देवी माऊली विद्यामंदिर सातोसे नं.१, ता. सावंतवाडी), आदर्श माध्यमिक शिक्षक महादेव पुंडलिक पवार (प्रगत विद्यामंदिर रामगड, ता. मालवण), आदर्श समाजसेवक नारायण तुकाराम चेंदवणकर राहणार - बांबुळी, ता. कुडाळ, तर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार शरद दत्ताराम चोडणकर (करंजे-नागवे-साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजे, ता. कणकवली) यांना प्राप्त झाला. तसेच एस. एस. सी. (१० वी) परीक्षा मार्च २०२५ बांदा केंद्र इंग्रजी विषयात प्रथम पूजा नारायण सावंत, मराठी विषयात प्रथम पूजा नारायण सावंत व श्रीशा सखाराम सावंत, विज्ञान विषयात प्रथम कृपा मुनेश वारंग, गणित विषयात प्रथम स्वरा अप्पासाहेब हरमलकर, एच. एस. सी. (१२ वी) मार्च २०२५ बांदा केंद्रात प्रथम सिध्दी अश्विनीकुमार वराडकर या गुणवंत विद्यार्थ्यांची निवड सत्कारासाठी करण्यात आली होती.

टाइम्स स्पेशल

सर्व उपस्थित सत्कारमुर्तींना अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल अच्युत सावंत भोसले यांचा जनसेवा निधी संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. मिलिंद खानोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व सत्कारमुर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ नार्वेकर यांनी, सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर यांनी तर आभारप्रदर्शन भरत गावडे यांनी केले. यावेळी प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अरविंद खानोलकर, अपर्णा खानोलकर, डॉ. आश्विनी खानोलकर, हेमंत खानोलकर, बांदा नट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, गुरुनाथ नार्वेकर, सुधीर शिरसाट, भरत गावडे, कमलाकर धुरी, अरुण देसाई, शंकर नार्वेकर, दत्ताराम साडेकर, बंड्या नार्वेकर, सुनील नाटेकर तसेच कै. डॉ. द. भि. खानोलकर यांना मानणारे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg