loader
Breaking News
Breaking News
Foto

सायकलवरून 226 गडकिल्ल्यांची ऐतिहासिक भटकंती; शिवप्रेमी कार्तिक सिंग यांचे कोलाडमध्ये जंगी स्वागत

कोलाड (श्याम लोखंडे) - शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेत उत्तराखंड येथील शिवप्रेमी कार्तिक सिंग यांनी सायकलवरून तब्बल 226 गडकिल्ल्यांची भटकंती पूर्ण केली आहे. त्यांच्या या अनोख्या आणि प्रेरणादायी प्रवासानिमित्त कोलाड आंबेवाडी नाक्यावर सकल हिंदू समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्गे भटकंती अवलिया शिवप्रेमी कार्तिकसिंग यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक शिवकालीन दुर्ग गडकिल्यांवर चक्क सायकलवरून प्रवास करत भटकंती केली तर दरम्यान प्रवास करत असताना कोलाड आंबेवाडी नाक्यावर सकल हिंदू समाज कोलाड आंबेवाडी पंचक्रोशी तर्फे त्याचे स्वागत करत त्याला पुढील सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवभक्त कार्तिक सिंग यांचे शिक्षण बी ए झाले आहे. हरियाणामध्ये नोकरी करत होते. परंतू यांच्या मनात शिवछत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या अस्मिता आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा झाली आणि 24 डिसेंबर 2024 पासून त्याचे मूळगाव उत्तराखंड येथून साकयलवारी प्रवास करत, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले भटकंती सुरू करत प्रथम छत्रपती शिवरायांच्या जन्म ठिकाण शिवनेरी किल्लावर नतमस्तक होऊन त्या किल्ल्यापासून सायकल प्रवास सुरु करत केला आणि जवळपास एकूण 226 दुर्ग किल्ले सायकल प्रवास करत गुरुवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता कोलाड आंबेवाडी नाक्यावर पोहचला आणि या ठिकाणी त्याची ओळख परीट सकल हिंदू समाज बांधव यांच्या समवेत होताच येथील सकाळ हिंदू समाज कोलाड आंबेवाडी पंचक्रोशी तर्फे त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

गेली अनेक दिवस परराज्यातील शिवशिलेदार शिवप्रेमी महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक असे दुर्ग गडकिल्यांवर सायकल सवारी करत भटकंती करत हा एक आगळा वेगळा आदर्श म्हणून त्याच्या जीवनातील क्षण म्हणून एक आजच्या पिढीसाठी एक वेगळा आदर्शच म्हणाव लागेल.तसेच शिवरायांचा एक आदर्श म्हणून कार्तिकसिंग याचे स्वागत केले यावेळी कोलाड पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस नरेश पाटील, महेशस्वामी जंगम, शिवभक्त स्वप्नील विचारे, कामेश देवकर, रोहित शिंदे, अजय लोटणकर, विजय शिंदे, सोहम चौधरी, छावा संघटनेचे अध्यक्ष तथा कोलाड विभागीय कुणबी समाज अध्यक्ष राजेश कदम, संतोष बाईत, भरत जाधव, उमेश पवार, स्थानिक सुरगड संस्थेचे तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, शिवभक्त किशोर सावरकर सह सकल हिंदू समाज कोलाड आंबेवाडी पंचक्रोशीतील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg