loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली जे.सी.आय.च्या अध्यक्षपदी डॉ. कुणाल मेहता यांची निवड

दापोली :- जे.सी.आय. दापोलीच्या अध्यक्षपदी डॉ. कुणाल प्रशांत मेहता यांची निवड करण्यात आली. जेसीआयचे २०२५ चे अध्यक्ष फराज रखांगे यांनी अधिकृतपणे त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. हा पदग्रहण व निवड सोहळा दापोली येथील पितांबरी रिसॉर्ट येथे उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना माजी अध्यक्ष फराज रखांगे यांनी जे.सी.आय. दापोलीच्या गेल्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला. जे.सी.आय. ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संघटना असून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात दापोलीत ५० हून अधिक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, वैद्यकीय तपासणी शिबिरे, पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसविणे, वृक्षारोपण तसेच समुद्रकिनारी शॉवर सुविधा उभारणे यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी गोवा व मुंबई येथून जे.सी.आय.चे पदाधिकारी गावडे व बुटाला उपस्थित होते. त्यांनी सदस्यांना मार्गदर्शन करत सामाजिक कार्यात सातत्य राखण्याचे आवाहन केले. नूतन अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना, आपल्या वडिलांच्या समाजकार्याच्या परंपरेप्रमाणेच समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. स्वतः वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने, आरोग्यविषयक समस्यांमध्ये गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजातील सर्व घटकांना समान न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी जे.सी.आय.च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, डॉ.शर्वरी मेहता तसेच जे.सी.आय. दापोलीचे जुने व नवे सदस्य, पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला अतुल गोंदकर, तेजस मेहता, ऋषिकेश तलाठी, मयुरेश शेठ, निकेत मेहता, स्वप्निल मेहता, रोशन वेदक, ऋषिकेश शेठ, समीर कदम, ॲड.बुटाला, कुणाल मंडलिक, अरुण गांधी यांच्यासह जे.सी.आय. दापोली व दशनेमा गुजर युवक संघटनेचे पदाधिकारी व जेसीआय दापोली सदस्य उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg