loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण प्रचारासाठी मुंबईत दाखल..

चिपळूण (संतोष पिलके)- राज्यातील प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुक प्रचारासाठी वॉर्ड प्रभारी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण मुंबईत दाखल झाले आहेत. पंचायत समितीचे माजी गटनेते राकेश शिंदे हीे त्यांच्यासोबत आहेत. धारावीतील प्रभाग क्र.१८७ आणि १८८ या दोन प्रभागांसाठी सदानंद चव्हाण यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीआहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. राज्यातील शिवसेना भाजप महायुतीसह शिवसेना (उबाठा) मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची महविकास आघाडी निवडणूक रिंगणात आहे. तर कॉंग्रेस या ठिकाणी स्वतंत्र लढत आहे. राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रचाराच्या याच धामधुमीत चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांना प्रभाग क्र.१८७ व १८८ या दोन प्रभागाचे प्रभारी म्हणून सदानंद चव्हाण या विभागात दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी त्यांनी प्रभाग क्रमांक १८८ मधील शिवसेनेचे उमेदवार भास्कर शेट्टी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तर प्रभाग क्रमांक १८७ मधील उमेदवार वकील शेख यांच्या कोपरा सभेत मार्गदर्शन केले. या दोन्ही प्रभागातील सविस्तर माहिती घेऊन सदानंद चव्हाण यांनी दोन्ही उमेदवारांच्या टीमला काही सूचना केल्या. प्रभाग क्रमांक १८७ मध्ये शिवसेनेची मुख्य लढत उबाठा आणि कॉंग्रेस सोबत आहे तर प्रभाग क्रमांक १८८ मध्ये कॉंग्रेस आणि एम आय एम सोबत शिवसेना लढत देत आहे. दोन्ही प्रभागातील मराठी मतदारांच्या भेटी गाठी घेऊन त्यांची निर्णायक मते शिवसेनेला मिळवण्यासाठी सदानंद चव्हाण आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg