loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण शहरातील मोरेश्वर स्मशानभूमी, महापुरुष बालोद्यान परिसरात बंद स्ट्रीटलाईट नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा सुरु

मालवण (प्रतिनिधी) - गेल्या अनेक दिवसापासून मालवण शहरातील मोरेश्वर स्मशानभूमी तसेच महापुरुष बालोद्यान परिसरात बंद असलेली स्ट्रीट लाईट, याभागाचे नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सुरु झाल्याने हा भाग प्रकाशाने उजळून निघाला आहे. मालवण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील मोरेश्वर स्मशानभूमी तसेच महापुरुष बालोद्यान परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळी अंधारामुळे परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या समस्येबाबत ठाकरे शिवसेना पक्षाचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, आज नगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट विभागामार्फत त्या ठिकाणच्या हाय-मास्ट लाईटसह मोठ्या पोलवरील स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आल्याने मोरेश्वर स्मशानभूमी आणि महापुरुष बालोद्यान परिसर पूर्णपणे प्रकाशमय झाला आहे.बर्‍याच कालावधीनंतर स्ट्रीट लाईट सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी नगरपालिकेच्या दिवाबत्ती विभागाचे आभार मानत भविष्यातही प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg