loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबेगाव नं.1 शाळेत भाकरी भाजणे उपक्रम

नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील जि.प.पू. प्राथमिक शाळा आंबेगाव नं.1 येथे शाळेच्या स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकामार्फत 'भाकरी भाजणे ' हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. आनंददायी शनिवार अंतर्गत दिनांक 3 जानेवारी 2026 ला हा उपक्रम शाळेत घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा व स्वावलंबन यासारखे गुण वृद्धिंगत व्हावेत यासाठी हा मूल्यवर्धित उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या पदवीधर शिक्षिका रसिका नाईक यांच्या संकल्पनेतून तसेच मुख्याध्यापक प्रदीपकुमार म्हाडगुत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपशिक्षिका स्नेहल कांबळे तसेच स्काऊट व कब मास्टर नितीन सावंत यांच्या सहकार्यातून हा सुरेख उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेचे मुख्याध्यापक व स्काऊट मास्टर म्हाडगुत, रसिका नाईक, स्नेहल कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तेजस्वी गावडे, शालेय पोषण आहार स्वयंपाकी सान्वी परब, नमिता पंदारे तसेच सविता गावडे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भाकरी भाजण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या उपक्रमात शाळेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट पथक, राणी लक्ष्मीबाई गाईड पथक, शिवरत्न संभाजी कब पथक, राजमाता जिजाऊ बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला.

टाइम्स स्पेशल

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी आंबेगाव नं.1 शाळेला भेट दिली होती. तेव्हा शाळा व विद्यार्थी गुणवत्तेचे भरभरून कौतुक केले होते. तसेच मुलांना सुद्धा मुलींप्रमाणे स्वयंपाक करता आला पाहिजे, असे सूचित केले होते. या प्रेरणेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जीवन शिक्षणाचा अनुभव देणाऱ्या शाळेच्या या उपक्रमाबद्दल पालक व ग्रामस्थांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg