loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी

संगलट (खेड )(इक्बाल जमादार) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चिपळूण कडून मुंबई दिशेने जाणारा पेप्सी वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंटेनर चालक राम आचल मिंद (रा. उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक एमएच ४३ जीई २२४४ घेऊन लोटे ते भिवंडी-वाडा असा प्रवास करत होता. कशेडी घाटात पोलादपूरजवळ चोळई गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर पलटी झाला. या अपघातात कंटेनरमधील पेप्सीच्या बाटल्या महामार्गावर सर्वत्र अस्ताव्यस्त पसरल्या असून कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने एक लेन पूर्णपणे बंद झाली होती मात्र पोलिसांनी त्वरित वाहतूक सुरळीत होण्यासाठी कारवाई केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg