loader
Breaking News
Breaking News
Foto

टोपीवाला हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा १७ रोजी स्नेहमेळावा

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील टोपीवाला हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे टोपीवाला हायस्कूल आणि मालवण एज्युकेशन सोसायटीशी संलग्न इतर शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा १७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत मालवण टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्नेहमेळाव्यात संघटनेचा वार्षिक अहवाल, कार्यपद्धती याची माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर एमव्हीएसच्या वेबसाईटचे उद्घाटन केले जाणार आहे. मेळाव्यासाठी प्रत्येकी १०० रु. वर्गणी ठेवण्यात आली आहे. शाळेतील व्यं. ह. सांगावकर ज्ञानमंदिर या इमारतीतील संघटनेच्या कार्यालयात सकाळी १० ते १२.३० या वेळेत वर्गणी भरून नाव नोंदवता येईल.

टाईम्स स्पेशल

माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित रहावे. त्यासाठी वर्गणी भरून आपले नाव ९५२९७८६७८१ या क्रमांकावर नोंदवावे. अधिक माहितीसाठी रघुनाथ शेवडे (९४२११४५६९९) किंवा नंदन देसाई, डॉ.अश्विन दिघे, प्रमोद मोहिते यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन माजी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg