loader
Breaking News
Breaking News
Foto

दारू पिऊ नकोस सांगितल्याने पतीकडून पत्नीला बेदम मारहाण

खेड (प्रतिनिधाी) - दारू पिण्यासाठी घराबाहेर जाणार्‍या पतीला मज्जाव केल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात पीव्हीसी पाईपने प्रहार करून तिला गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना खेड येथील भरणेनाका परिसरात घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी संशयित आरोपी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी वियोग चंद्रकांत पाटणे हे खेड तालुक्यातील भरणेनाका येथील रुचिरा हॉटेलच्या पाठीमागे वास्तव्यास आहेत. २९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास आरोपी वियोग पाटणे हा दारू पिण्यासाठी घराबाहेर जात होता. यावेळी पत्नीने त्याला दारू पिण्यास विरोध केला आणि बाहेर जाण्यापासून रोखले. आपल्या कामात अडथळा आणल्याचा राग अनावर झाल्याने वियोग पाटणे याने पत्नीला अर्वाच्च शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे स्वरूप वाढल्याने त्याने घरातील पीव्हीसी पाईप घेऊन पत्नीच्या डोक्यात दोन ते तीन वेळा जोराने प्रहार केले. या हल्ल्यात फिर्यादी महिला जखमी झाली असून आरोपीने तिला पुन्हा जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी वियोग पाटणे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३३२(२) आणि ३५१ (३) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg