loader
Breaking News
Breaking News
Foto

मालगुंडमध्ये ‘भंडारी प्रीमियर लीग २०२६’चा बिगुल वाजला

​रत्नागिरी - कोकणच्या क्रीडा विश्वात मानाची समजली जाणारी 'भंडारी प्रीमियर लीग २०२६' (BPL) ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवारी, ६ जानेवारी २०२६ रोजी मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयाच्या सभागृहात या स्पर्धेचा लिलाव आणि भव्य चषक अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याने रत्नागिरीतील क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेसाठी एकूण १६ संघ रिंगणात आहेत. लिलाव प्रक्रियेदरम्यान ३२ आयकॉन खेळाडूंसह एकूण २२४ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आता हे सर्व संघ मैदानात एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज झाले असून लवकरच मालगुंड येथील कै. नानासाहेब मयेकर क्रीडांगण (खारभूमी) येथे हा भव्य क्रिकेट महासंग्राम रंगणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेच्या फिरत्या चषकाचे दिमाखात अनावरण करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर विवेक सुर्वे, उदय पाटील, राहुल वारे समीर बोरकर, बाळू बागकर, श्रमिक भाटकर, संतोष पाटील, राहुल पिळणकर, डॉ. मयुरेश पाटील, सर्वेश्वर आडाव, रवी बोरकर, बाबू शिवलकर, कल्पेश महाकाळ तसेच सर्व संघ मालक, आयोजक आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमादरम्यान आयोजक निखिल बोरकर यांनी स्पर्धेची संपूर्ण पार्श्वभूमी मांडली. "केवळ खेळ म्हणूनच नव्हे, तर समाज बांधवांना एकत्र आणणे आणि स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे," असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg