loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली येथे १० रोजी जिल्हा सॉफ्टबॉल संघ निवड चाचणी

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व सोलापूर जिल्हा साॅप्टबाॅल असोसिएशन तर्फे दि. १८ ते २१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ३१ व्या ज्युनिअर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघ (मुले व मुली) निवड चाचणीचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा हौशी सॉफ्टबॉल असोसिएशन, मालवण यांच्या वतीने शनिवार दि. १० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता विद्यामंदिर कणकवली प्रशालेच्या मैदानावर आयोजित केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या चाचणीत निवड झालेला जिल्हा संघ दि. १८ ते २१ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा श्री राजे फत्तेसिंह मैदान, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ज्युनिअर (मुले व मुली) गटासाठी असून खेळाडूंची ग्राह्य जन्मतारीख १ जानेवारी २००८ किंवा त्यानंतरची असणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

निवड समिती प्रमुख अच्युत वनवेसर, निवड समिती सदस्य सुदीन पेडणेकर, कमलेश गोसावी, विजय मयेकर, उत्तरेश्वर लाड, संतोष तावडे, डी. डी. सावंत या प्रशिक्षकांची निवड समिती उपस्थित खेळाडूंमधुन जिल्ह्याचा संघ निवडणार आहेत. जिल्ह्यातील होतकरू, गुणवंत व इच्छुक सॉफ्टबॉल खेळाडूंनी या निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी अजय शिंदे- सचिव ९४२२३९४१८६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्था कार्याध्यक्ष विजय मागाडे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg