loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्रकार दिनी खेडमध्ये समाजसेवेचा आदर्श; पत्रकार संघटनेचे रक्तदान शिबीर यशस्वी

खेड : येथील मराठी पत्रकार संघटनेच्यावतीने मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भरणे येथील जोगळे बंधू मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरास तालुक्यातील रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोल्हापूर येथील बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल अंतर्गत वैभवलक्ष्मी ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात घरडा हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची प्राथमिक तपासणी करून सुरक्षित रक्तसंकलन केले. एकूण ३५ युनिट रक्त संकलित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सेवाभावी उपक्रमाला नगराध्यक्ष माधवी बुटाला, माजी नगराध्यक्ष गौरी पुळेकर, माजी नगराध्यक्ष व भाजप नेते वैभव खेडेकर, तहसीलदार सुधीर सोनवणे तसेच माजी खासदार हुसेन दलवाई यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गोविंद राठोड यांच्यासह राकेश कोळी, ज्ञानेश्वर रोकडे, उमेश खेडेकर, शुभम केसकर, सिद्धेश परशेट्ये, दिलिप देवळेकर, नंदेश खेडेकर, सागर कदम, सचिन खेडेकर, रुपेश चव्हाण, दिवाकर प्रभू, हर्षल शिरोडकर, चंद्रकांत बनकर, देवेंद्र जाधव, संतोष आंब्रे, मनोहर गद्रे आदी पदाधिकारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश खेडेकर यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामुळे मराठी पत्रकार दिनाला सेवाभावी उपक्रमाची सुंदर जोड लाभली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg