loader
Breaking News
Breaking News
Foto

कुवे गावातील तरुणावर बिबट्याचा हल्ला

लांजा (संजय साळवी) - बिबट्याने मोटरसायकलस्वारावर केलेल्या हल्ल्‌यामध्ये एक २६ वर्षीय तरुण जखमी झाला. मात्र बिबट्याच्या हल्ल्‌यात तो बालंबाल बचावला आहे. ही घटना लांजा नजीकच्या कुवे गावातील घोडखिंड येथे घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कुवे माळवाडी येथे राहणारा योगेश सुधीर पवार (२६ वर्षे) हा आपले काम आटोपून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटरसायकलने घरी चालला होता. कुवे घोडखिंड या ठिकाणी तो आला असता या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्याच्या दिशेने झेप घेतली. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्‌यामुळे मोटरसायकलस्वार योगेश पवार हा घाबरून गेला. मात्र तरीही प्रसंगावधान राखून त्याने बिबट्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी मोटारसायकलवर स्वतःला झोकून दिले. तर त्याच्या पाठीमागे असलेल्या बॅगमुळे बिबट्याच्या हल्ल्‌यापासून तो बालंबाल बचावला आहे. मात्र मोटरसायकल घसरल्याने तो खाली पडल्याने यामध्ये तो जखमी झाला आहे. या घटनेत योगेश पवार याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. मात्र अशाप्रकारे बिबट्याने मोटरसायकलस्वारावर केलेल्या हल्ल्‌यामुळे कुवे गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनखात्याने या घटनेची दखल घेवून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg