loader
Breaking News
Breaking News
Foto

राजवाडा सावंतवाडी येथे दशावतार महोत्सवाचे आयोजन

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व लोककला विभाग आयोजित लोककला महोत्सव चौथा दशावतार नाट्य महोत्सव राजवाडा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा व संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी सौ.श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त , मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमसावंत भोंसले, संस्थेचे कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश सावंत , संचालक प्रा. डी टी देसाई, सहसंचालक ॲड. शामराव सावंत, दशावतार महोत्सवाचे समन्वयक दिलीप गोडकर , नगरसेवक आनंद नेवगी, सौ.निलम नाईक, प्रतीक बांदेकर, सौ.दिपाली भालेकर, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक , गौरव जाधव , नाईक मोचेमांडकर दशावतारी नाट्य मंडळाचे तुषार नाईक, कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळ नेरूरचे राजू कलिंगन, पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार , ॲड. पी.डी देसाई, नकुल पार्सेकर, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व सावंतवाडीतील दशावतारी नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्व उपस्थित मान्यवरांचे श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल यांनी स्वागत केले. प्रास्ताविक दिलीप गोडकर यांनी केले. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी सावंतवाडी शहरांमध्ये हा दशावतार महोत्सव होत आहे. याबद्दल आनंद व्यक्त केला व दशावतार महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा उद्घाटक प्रभाकर सावंत यांनी सावंतवाडी राजवाडा येथे आयोजित दशावतार महोत्सवाला येण्याचे हे दुसरे वर्ष आहे असे ते म्हणाले. गेल्या वर्षी याच दशावतार महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झालेले होते त्यावेळीही ते उपस्थित होते. श्री पंचम खेमराज महाविद्यालय हे आपल्या लोककला विभागाच्या वतीने दरवर्षी या दशावतार नाट्यमहोत्सवाच्या आयोजन करीत आहेत, याबद्दल कौतुक केले व दशावतार कलेला राजाश्रय मिळालेला आहे हे बघून समाधान व्यक्त केले. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज लखमसावंत भोंसले यांनी सर्व उपस्थित दशावतार नाट्य रसिकांना धन्यवाद दिले व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने हा एक स्तुत्य उपक्रम गेली चार वर्ष सातत्याने चालू ठेवलेला आहे याबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी.एस मर्गज यांनी केले व आभार मानले. त्यानंतर नाईक मोचेमांडकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ मोचेमांड, वेंगुर्ला यांचा 'नीलमाधव ' व कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा 'गोमय गणेश' हे नाट्यप्रयोग झाले त्यांना नाट्यरसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg