loader
Breaking News
Breaking News
Foto

बांधखिंड शिरगाव येथे दुचाकी अपघात; कुत्रा आडवा आल्याने तरुण जखमी

शिरगाव : दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बांधखिंड, शिरगाव येथे घडली. या अपघातात शुभम नाचणकर (रा. आंबे शेत) हा तरुण जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम नाचणकर हा आपल्या दुचाकीवरून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. बांधखिंड येथील शिवसृष्टी गृहनिर्माण संस्थेबाहेर अचानक एक कुत्रा दुचाकीसमोर आडवा आल्याने त्याचा तोल जाऊन तो रस्त्यावर कोसळला. या अपघातात शुभमला दुखापत झाली असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल अमिता पाटील आणि केतन साळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील कार्यवाही केली. दरम्यान, गेल्या एक महिन्यापासून बांधखिंड परिसरात वारंवार अपघात घडत असल्याचे चित्र आहे. गणपतीपुळे दिशेने जाणारी वाहने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढत असल्याने या ठिकाणी वाहतूक वाढते. मात्र, बांधखिंड येथे वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीसह येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदर परिसर अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करून वेग नियंत्रणासाठी रंबलर (स्पीड ब्रेकर) बसवण्याची मागणी केली होती. मात्र, सहा महिने उलटूनही ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg