loader
Breaking News
Breaking News
Foto

१७ व्या ऑल इंडिया शोतो कप कराटे स्पर्धेत कुडाळच्या विद्यार्थ्यांचे यश

सावंतवाडी (प्रतिनिधी) - १७ वी शोतो कप कराटे स्पर्धा यावेळी मीरा भाईंदर येथे वंजारी ब्रँच मार्फत घेण्यात आल्या या स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून शिहान सुधीर वंजारी ७ डिग्री ब्लॅक बेल्ट यांनी काम पहिले. यात जवळ जवळ १५० ते २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा काता व कु्मिते या दोन्ही प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेत कुडाळ कराटे क्लास च्या विद्यार्थीनींनी दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे. शिवाय बेस्ट कराटे क्लास ची ट्रॉफी पण मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यात कुडाळच्या विद्यार्थीनींनी पुढीलप्रमाणे यश मिळाविले. पूर्वी सिद्धेश कुबल काता-रौप्य, कुमिते-रौप्य, दिव्यांगी कुलकर्णी-काता-सुवर्ण कुमिते-सुवर्ण ट्रॉफी दुर्वांकुर घाडी काता-सुवर्ण कुमिते-सुवर्ण ट्रॉफी, परिधी खोत काता-सुवर्ण कुमिते-सुवर्ण, उपेंद्र पवार काता-सुवर्ण कुमिते-सुवर्ण, खुला गट- रौप्य ट्रॉफी, मैत्रेय प्रभू काता-सुवर्ण कुमिते-सुवर्ण सर्वेश गावकर काता-रौप्य कुमिते-रौप्य, पार्थ पवार काता-सुवर्ण कुमिते-सुवर्ण प्रांजल पवार काता-सुवर्ण कुमिते-सुवर्ण, यामध्ये १४ सुवर्ण आणि ५ रौप्य पदक आणि ट्रॉफी मिळवली. या विद्यार्थीना यश मिळण्यासाठी कराटे प्रशिक्षक अशफाक शेख २ डिग्री ब्लॅक बेल्ट यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg