loader
Breaking News
Breaking News
Foto

​टॉवर मंजूर, कामही पूर्ण; पण नेटवर्क गायब! तिरोडा ग्रामस्थांचा २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून बीएसएनएल (BSNL) ४जी टॉवरचे काम पूर्ण होऊनही सेवा सुरू न झाल्याने तिरोडा ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने, येत्या २६ जानेवारी रोजी सावंतवाडी बीएसएनएल कार्यालयासमोर संपूर्ण गावासह उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच प्रियांका सावंत यांनी दिला आहे. ​तिरोडा येथे बीएसएनएलचा ४जी टॉवर मंजूर झाला असून त्याचे भौतिक काम पूर्ण होऊन अर्ध्या वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, तांत्रिक प्रक्रिया रेंगाळल्याने हा टॉवर अद्याप कार्यान्वित झालेला नाही. या संदर्भात ग्रामपंचायतीने आतापर्यंत बीएसएनएल कार्यालयात ३ ते ४ वेळा बैठका घेतल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"दिवाळीपूर्वी टॉवर सुरू होईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते, मात्र परिस्थिती 'जैसे थे' आहे. उलट, पूर्वी जे थोडेफार साधे कॉलिंगसाठी नेटवर्क मिळत होते, ते देखील आता पूर्णपणे बंद झाले आहे," अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली आहे. ​नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून डिजिटल व्यवहारही ठप्प झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर आणि इतर सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जर २६ जानेवारीपूर्वी नेटवर्क सुरू झाले नाही, तर सावंतवाडी येथील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे लेखी निवेदनात म्हटले आहे. ​यावेळी ​प्रियांका सावंत (सरपंच, तिरोडा), ​संदेश केरकर (उपसरपंच), ​भास्कर गोडकर (सदस्य), विश्रांती साळगावकर (सदस्य), ​गावडे मॅडम ( सदस्य) उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg