loader
Breaking News
Breaking News
Foto

पाककला स्पर्धेत रोहिणी तायशेटे विजेत्या

मालवण (प्रतिनिधी) - शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महायुतीच्या कार्यालयात शहरातील महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत रोहिणी तायशेटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तांदळापासून पौष्टिक पदार्थ बनविणे या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेत शहरातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध रुचकर आणि आरोग्यदायी पदार्थ सादर केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत महिलांनी आपल्या कल्पकतेने तांदळाचे विविध प्रकार बनवले होते. परीक्षकांनी चव, सादरीकरण आणि पौष्टिक मूल्य या निकषांवर विजेत्यांची निवड केली. यात संगीता तायशेटे यांना द्वितीय तर सुचित्रा सावंत यांना तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण स्मृती कांदळकर, विनय गावकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नगरसेविका पूनम चव्हाण, शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, स्वप्नाली नेरुरकर, मधुरा तुळसकर आणि प्रमिला मोरजे यांच्यासह अन्य शिवसेना महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला स्पर्धक उपस्थित होत्या. स्पर्धेतील विजेत्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामंत यांनी महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg