loader
Breaking News
Breaking News
Foto

“श्रीवर्धन मतदारसंघाचा विकास हाच आमचा श्वास” - खासदार सुनिल तटकरे

म्हसळा-रायगड - श्रीवर्धन मतदारसंघातील गाव-वाडी-वस्त्यांमधील ग्रामस्थ व पक्ष कार्यकर्त्यांनी विकास कामांबाबत ज्या कल्पना मांडल्या, विकासासाठी जे-जे अपेक्षित होते ते-ते सर्व कामे मी, मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, असल्याचे प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी केले. म्हसळा तालुक्यातील मौजे मेंदडी येथे सुमारे ४ कोटी रुपये खर्चाच्या जेट्टी व पोच रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा निवडणूक काळात उमेदवार असताना या कामांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. त्या विश्वासावर जनतेने भरभरून मतदान करून प्रेम व्यक्त केले. त्यानुसार “श्रीवर्धन मतदारसंघाचा विकास हाच आमचा श्वास” या ब्रीदवाक्याप्रमाणे मतदारसंघात शाश्वत विकास सुरू असल्याचे खासदार तटकरे यांनी स्पष्ट केले. तटकरे कुटुंब विकास करणारे असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल हा विश्वास जनतेच्या मनात दृढ झाला आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस विकास कामांची यादी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या प्रकारे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेने माझ्यावर व आदितीताई यांच्यावर विश्वास टाकला त्याचप्रमाणे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणनिहाय निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या मी महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक प्रचारात व्यस्त असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याची जबाबदारी पक्ष कार्यकर्त्यांनी घ्यावी, अशी भूमिका खासदार तटकरे यांनी मांडली. मेंदडी येथे यापूर्वी दोन्ही बाजूंनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकास करण्यात आला आहे. नव्याने महाराष्ट्र गृह विभाग, बंदरे व परिवहन सागरी मंडळामार्फत जेट्टी व पोच रस्ता बांधकामाची मंजुरी मिळवण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत तीन वेळा बैठका पार पडल्या. त्यांचे सहकार्याचे खासदार तटकरे यांनी विशेष आभार मानले. म्हसळा तालुक्यात विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत खासदार सुनिल तटकरे यांचे वाजत-गाजत मिरवणूक काढून स्वागत केले. या प्रेमळ सत्काराबद्दल त्यांनी मनोमन आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव कांबळे यांनी केले. स्वागत व स्तुतीपर सुस्वर गीत प्रसिद्ध गीतकार विजय पायकोळी यांनी सादर केले.

टाइम्स स्पेशल

या भव्य कार्यक्रमास खासदार सुनिल तटकरे यांच्यासह निवासी नायब तहसीलदार शेखर खोत, गट विकास अधिकारी माधव जाधव, तालुका अध्यक्ष समीर बनकर, श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, माजी सभापती महादेव पाटील, माजी सभापती बबन मनवे, उद्योगपती जमीरभाई नजीर, माजी सभापती छाया म्हात्रे, स्वप्नील बिराडी, गण अध्यक्ष मोरेश्वर पाटील, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, मधुकर गायकर, गण अध्यक्ष अनिल बसवत, प्रसाद बोर्ले, नाना सावंत, महेश घोले, किरण पालांडे, लहू म्हात्रे, मंगेश म्हशीलकर, स्वप्नील चांदोरकर, मधुकर पाटील, नथुराम पयेर, लोमेश हरिचंद्र पाटील, विजयबुवा पायकोळी, रमेश डोळकर, चंद्रकांत भगत, अखंड कोळी समाज, आगरी समाज तसेच मेंदडी येथील ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg