loader
Breaking News
Breaking News
Foto

अमरावतीमध्ये शिवसेनेची जाहिर सभा

शिवसेना सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी जन्माला आली आहे, असे ठणकावून सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सत्तालालसेवर घणाघाती प्रहार केला. मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा असल्याचा स्पष्ट संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणात आक्रमकपणे उतरायचे आदेश दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अमरावतीत थेट रणशिंग फुंकले. नेहरू मैदानावर झालेल्या जाहीर प्रचारसभेत त्यांनी विकास, महिला सशक्तीकरण, मूलभूत सुविधांचा अभाव आणि विरोधकांच्या अपयशावर जोरदार हल्लाबोल करत, जे बोलतो ते करतो, कमी बोलतो पण जास्त काम करतो, असा ठाम विश्वास मतदारांना दिला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील नेहरू मैदानावर शिवसेनेची जाहीर प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडली. महिलांचा पाठिंबा म्हणजे विजयाची खात्री, असे सांगत नगरपरिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतील अनुभव त्यांनी मांडला.

टाईम्स स्पेशल

उपमुख्यमंत्र्यांनी अमरावतीतील पाणीटंचाई, खराब रस्ते, कचरा व्यवस्थापन, लटकलेल्या वीजतारा, स्ट्रीट लाईट, गटार व्यवस्था, उद्याने, मैदान, स्टेडियम, रुग्णालये अशा मूलभूत प्रश्नांवर थेट भाष्य केले. या सभेला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता, जलसंधारण मंत्री संजय राठोड, ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार संजय रायमुलकर, प्रियांका विश्वकर्मा, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg