loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूल खेडमध्ये ’प्रोजेक्ट ऊर्जा’ उपक्रमाचा समारोप समारंभ

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये नेरोलॅक पेंट्स लोटे व ज्ञान प्रबोधिनी पुणे संवादिनी गट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या प्रोजेक्ट ऊर्जा प्रकल्पाचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर नेरोलॅक पेंटचे सी. एस. आर. हेड संतोष देशमुख व एच. आर. हेड नंदन सुर्वे यांचे स्वागत रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांनी शाल, श्रीफळ व रोपटे देऊन केले. त्यानंतर संवादिनी गटाच्या प्रोजेक्टप्रमुख सौ. विशाखा वेलणकर तसेच समुपदेशक अमिता बेहेरे, समृद्धी देशमुख, स्नेहल आपटे व व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके यांच्या हस्ते पुस्तकरुपी भेट देऊन करण्यात आले. त्यानंतर ज्ञान प्रबोधनी पुणे व संवादिनी गट यांच्या अंतर्गत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सत्रे घेण्यात आली होती. यांवर आधारित वैभव माटवणकर यांनी उत्कृष्ट संकलन केलेली चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाप्रसंगी कु. शाल्मली पवार व कु शौर्य चाळके या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सौ. भक्ती करंबेळकर यांनी ’प्रोजेक्ट ऊर्जा’ प्रकल्पाचा थोडक्यात आढावा सादर केला. तद्नंतर कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर संतोष देशमुख व सौ. विशाखा वेलणकर यांनी आपल्या मनोगतात सर्व प्रकल्पांचा थोडक्यात आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक करून त्यांनी या उपक्रमांतर्गत मिळालेले ज्ञान दैनंदिन जीवनात अमलात आणावे, असे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ.प्रितम वडके, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg