loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि शिवसेना लोकप्रतिनिधींच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात असून आता कचरा व्यवस्थापनाबाबत कडक पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मालवणच्या नगरसेविका मेघा गावकर यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेत मालवणच्या स्वच्छतेसाठी ४० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची फळी उपलब्ध करून दिली आहे. हे कर्मचारी सध्या पूर्ण क्षमतेने शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता करत असून शहराचे रूप पालटताना दिसत आहे. २१ तारखेला नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर आणि सर्व नगरसेवकांनी तातडीने मार्केट परिसराची पाहणी केली. व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी कचरा गाडीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ही गाडी आता दररोज नियमितपणे कचरा संकलित करत असून नागरिकांना त्याबाबत पूर्वसूचनाही देण्यात आली आहे, अशी माहितीही नगरसेविका गावकर यांनी दिली

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg