loader
Breaking News
Breaking News
Foto

मयूर कांबळे बॅडमिंटन अकॅडमीची खेळाडू सानिका सुतारची राष्ट्रीय पातळीवर झेप

चिपळूण (संतोष पिलके) : मयूर कांबळे बॅडमिंटन अकॅडमीची होतकरू खेळाडू सानिका सुतार हिने आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. सानिकाची नॅशनल तसेच ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ साठी निवड झाली असून, या यशामुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेज, लवळे येथे वेस्ट झोन युनिव्हर्सिटी बॅडमिंटन टूर्नामेंट आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सानिकाने MIT WPU कॉलेजचे प्रतिनिधित्व केले. अत्यंत चुरशीच्या लढतीत सानिका आणि तिच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सानिकाची थेट राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तसेच ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ साठी निवड झाली आहे. तिच्या या यशामागे कठोर सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा मोलाचा ठरला आहे. सानिकाच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि अकॅडमीकडून तिचे अभिनंदन होत असून, पुढील वाटचालीसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg