loader
Breaking News
Breaking News
Foto

कुडाळकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची परब यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन, मालवण संचलित डॉ. एस. एस. कुडाळकर प्राथमिक शाळा, मालवण या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची प्रशांत परब यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील पंचवीस वर्षांच्या यशस्वी, निष्ठावान व सेवाभावी कार्यासाठी 'आदर्श शिक्षक पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी यांच्या हस्ते सौ. प्राची परब यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत केलेली सातत्यपूर्ण वाढ, तसेच शिक्षक म्हणून दाखविलेली निष्ठा व नेतृत्वगुण याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सौ. प्राची परब यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास व्यासपीठावर श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशनचे उपाध्यक्ष भालचंद्र राऊत, संस्थेचे सचिव महेश मांजरेकर, महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष श्री. गणपत चौकेकर, उपाध्यक्षा सौ. गुळवे, सचिव श्री. नार्वेकर तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg