loader
Breaking News
Breaking News
Foto

भिवंडीत पडघा येथे बेकायदेशीर बंदुकीसह एकाला अटक ; १२ बोअर बंदूकीसह ५ जिवंत काडतुसे जप्त

ठाणे दि १७: (प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एकाला ठाणे ग्रामीण पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीची सिंगल नळीची १२ बोअर बंदूक आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६.१५ वाजण्याच्या दरम्यान एका अनोळखी इसमाने बेकायदेशीररीत्या गावठी बनावटीची बंदूक आणि जिवंत काडतुसे मिळवून ती मौजे सुकाळेपाडा, लाप बुद्रुक (पो. पडघा) येथील दगडू लक्ष्मण थापड यांच्या घरात ठेवून पलायन केले. यावेळी थापड यांनी घराला कुलूप लावून शेतात गेले होते. या प्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलिस अधीक्षक तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण अनमोल मित्तल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल झालटे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गिते यांनी पडघा पोलिस ठाण्याचे निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना समांतर तपासाचे आदेश दिले होते.

टाइम्स स्पेशल

पोलिस पथकाने गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास करत अल्पावधीत भिवंडी, भोगाडेपाडा, घोटगाव येथील दौलत काकडया भोगाडे याला ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर करत आहेत. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक उमेश रोठे, पोलिस नाईक बाळासाहेब जाधव, मनोहर पवार, पोलिस शिपाई सुरेश खडके आणि रुपेश जाधव यांनी सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg