ठाणे दि १७: (प्रतिनिधी) ठाण्यातील घोडबंदर रोडवरील येथे रविवारी सकाळी कामाला निघालेल्या दुचाकीस्वार याच्या दुचाकीला भीषण अपघात झाल्यानं दुचाकीस्वार हा अज्ञात वाहनाच्या खाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
विवारी सकाळी सात ते सव्वासात वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजयनगर मेट्रो स्टेशनजवळ डी-मार्टसमोर भीषण अपघात झाला. अनोळखी वाहनाच्या टायरखाली आल्याने दुचाकीस्वार सोनू सुधाकर जाधव (वय.२०) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तो मूळचा नाशिकचा रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मयत सोनू हा खासगी नोकरी करत असून १७ मे रोजी (रविवारी) सकाळी कामासाठी दुचाकीवरून जात होता. यावेळी विजयनगर मेट्रो स्टेशन जवळील डी-मार्टसमोर अनोळखी वाहनाच्या टायरखाली आल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास कासारवडवली पोलिसांमार्फत सुरू आहे






















































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.