अलिबाग - ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण रायगड जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आला. या ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा केल्यावर आलिंगन देत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. काल शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यामुळे आज रमजान ईद साजरी करण्यात आली. अलिबाग शहरातील जामा मशिदीत सकाळीच मुस्लिम बांधवानी रमजान ईदची सामुदायिक नमाज अदा केली. यावेळी मौलानांनी कुराण पठण करून उपस्थित मुस्लिम बांधवाना रमजान ईदचे महत्व सांगितले.
नमाज अदा केल्यानंतर मशिदीबाहेर पोलीसांनी गुलाबपुष्प देवून सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गर्दी केली होती. जिल्हयातील 236 मशिदी, 28 दर्गाह, 19 मदरसा आदि ठिकाणी नमाज पठण करण्यात आले.
ईद निमित्त मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. घरोघरी शिरकुर्मा तयार करण्यात आला होता. एकमेकांच्या घरी शिरकुर्म्याचे वितरण करण्यात आले. घरी येणारया पाहुण्यांना आवर्जून शिरकुर्मा खायला दिला जात होता. सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी पोलीसांनी विशेष काळजी घेतली होती. 87 पोलीस अधिकारी, 569 पोलीस अंमलदार, 3 दंगल नियंत्रण पथके, 12 स्ट्रायकिंग फोर्स, 59 वाहतूक अंमलदार तैनात करण्यात आले होते.






























































































































































































































































































































.jpg)






















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.