loader
Breaking News
Breaking News
Foto

गोवा ते शिर्डी पदयात्रेचे बांद्यात स्वागत

बांदा (प्रतिनिधी) - गोमंत साई सेवक वारकरी समिती व श्री राष्ट्रोळी साई मंदीर सांगोर्डा बार्देश गोवा आयोजीत गोवा ते क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा सोहळा गुरुवार दि. 8 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पासून सुरु करण्यात आली. या पदयात्रेचे शुक्रवारी 9 जानेवारी रोजी बांदा शहरात साईभक्त बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठात श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. हि पदयात्रा गेली 9 वर्षे सुरू असून 23 जानेवारी पर्यत हि पदयात्रा शिर्डीला पोहचेल. सतत 16 दिवस हि पदयात्रा सुरू असुन अनेक ठिकाणी या वारक-याचे स्वागत करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पदयात्रेत 170 साईभक्त सहभागी झाले आहेत. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद मालवणकर, खजीनदार राजेश कारेकर,विश्वस्त साईराज साळगांवकर, साईशकुमार केसरकर, प्रितम हरमलकर, निखील मयेकर, बंड्या हरमलकर, दर्शना केसरकर, श्रेया केसरकर, प्रिया केसरकर, सल्लागार अच्युत पिळणकर, जेष्ठ भजनकर्मी गिरीकाका महाजन, सतीश नाटेकर, मंगलदास सांळगावकर, विजय कासार, विनेश गवस, साईश तोरसकर ज्ञानेश्वर येडवे, ऋषी हरमलकर उपस्थित होते. साईसेवक वारकरींचे स्वागत सतीश नाटेकर यांनी केले, साईपादुकांची पाद्यपूजा साईशकुमार केसरकर यांनी केली. मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर व उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर यांना गोमंत साई सेवक व वारकरी समीतीच्या पदाधीकारीनी सन्मानीत केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg