loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने मेडिकल इक्विपमेंट बँक स्थापन

वैभववाडी (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या वतीने वैभववाडी येथे मेडिकल इक्विपमेंट बँक स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये विविध आरोग्य विषयक साहित्य रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्यामार्फत वैभववाडी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाला सुपूर्द करण्यात आले आहे. यावेळी माजी गव्हर्नर रोटरीयन डॉ. संग्राम पाटील, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, असी. गव्हर्नर डॉ. प्रशांत कोलते, एरिया हेड डॉ. विद्याधर तायशेटे, शांताराम काका रावराणे, रोटरीचे अध्यक्ष सचिन रावराणे, नामदेव गवळी, स्नेहल रावराणे, संतोष टक्के, प्रशांत गुळेकर, संजय रावराणे व सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मेडिकल इक्वीपमेंटमध्ये वॉटर बेड २, एअर बेड २, व्हीलचेअर २, वॉकर २, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन १, युरीन पोट १ आदी साहित्य संघाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या सर्व साहित्याची देखभाल जेष्ठ नागरिक संघामार्फत केली जाईल असे आश्वासन शांताराम काका रावराणे यांनी याप्रसंगी दिले. डॉ. संग्राम पाटील म्हणाले, समाधान मिळवण्यासाठी आपण चांगले काम केले पाहिजे. वैभववाडी क्लब आपल्या नेतृत्वाखाली स्थापन झाला. आणि तो सुस्थितीत सुरु आहे. याचा फार आनंद आहे. वस्तू फुकट दिली तर किंमत कळत नाही. म्हणून भाडे नाममात्र आकारले पाहिजे. वस्तूची मोडतोड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नेहमी दुसर्‍याचा विचार करणारे ते खरे रोटरीयन आहेत.

टाईम्स स्पेशल

वैभववाडी रोटरीच्या उत्कृष्ट कार्याला शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी गटविकास अधिकारी वाघ म्हणाले, राजकारण विरहित रोटरी क्लब आहे. समाजात शेवटच्या घटकापर्यंत रोटरीचे काम आहे. वयोरुद्ध व्यक्तींना आरोग्य साहित्याची नितांत गरज असते. त्यामुळे त्यांचा खर्च वाचेल, चांगले उपचार घेता येतील संघाचे कार्य छान आहे. डॉ. प्रशांत कोलते, संतोष टक्के, शांताराम काका रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्याधर सावंत यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg