loader
Breaking News
Breaking News
Foto

व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे हाॅटेल व्यवसायिकांनी पेटवल्या चुली

दापोली (प्रतिनिधी) - व्यवसायिक गॅस सिलेंडरचा तुडवडा जाणवत असला तरी दापोलीतील स्थानिक प्रशासन मात्र दापोलीत गॅस सिलेंडरची टंचाई मान्य करायला तयार नाहीत. सर्व सुरळीत आणि विना रांग लावून वितरण सुरू असल्याचे सांगत आहेत. हाॅटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि मिठाईवाले यांनी व्यवसायासाठी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणेबाबत विनंती केली होती. गॅस सिलिंडर उपलब्ध झाले नाहीत तर नाईलाजाने व्यवसाय बंद करावे लागतील असे सांगत कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल अशाप्रकाराचा प्रशासनाची प्रत्यक्ष भेट घेत लेखी इशारा दिला होता. मात्र परिस्थिती काहिच बदलली नाही त्यामुळे अखेर हाॅटेल व्यवसायिकांना चुली पेटवून व्यवसाय सुरु ठेवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाच्या परिस्थितीमुळं आणि आखाती देशांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं पुरवठा साखळी खंडित झाली आहे. याचा परिणाम सगळीकडेच जाणवू लागला आहे. त्यात दापोलीचीही कमी नाही. आखाती देशातून आयात होणाऱ्या गॅसमध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळं लहान-मोठ्या व्यावसायिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. घरगुती गॅसच्या किमतींत वाढ झाल्यानं सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघराचं आर्थिक नियोजन कोलमडलं आहे. तर व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं हॉटेल व्यावसायिकांना अनेक चिंता सतावू लागल्या आहेत. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळं व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा खंडित झाला आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स गॅस नसल्यामुळ दापोलीतील हाॅटेल व्यवसायिकांवर मोठीच आपत आली आहे. तरी मात्र स्थानिक प्रशासन मात्र सगळं सुरळीत सुरू असल्याचा आव आणत आहे. हेच का ते अच्छे दिन, असे लोकांना अशा या प्रकारामुळे म्हणावे लागत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg