ठाणे (प्रतिनिधी) : “ठाण्यासाठी उत्कृष्ट आणि दर्जेदार बांधकाम व्हावं, ही अपेक्षा आहे. मात्र पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक केल्यास अशा प्रकरणांना मी मुळीच सोडणार नाही. ”असा सज्जड दम भाजपाचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी बांधकाम व्यावसायिकांना समोरा समोर दिला MCHI Property Expo 2026 या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी उपस्थित राहून ठाण्यातील विकासाच्या मुद्द्यावर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. यावेळी ठाणे महापालिकेतील नगरसेवक विकास पाटील आणि सीताराम राणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात आमदार केळकर यांनी ठाण्याशी असलेलं आपलं नातं अधोरेखित करत सांगितले की, “मी चार पिढ्यांपासून ठाण्यात वास्तव्यास आहे. त्यामुळे ठाणे हे उत्तम नियोजनबद्ध आणि सुस्थितीत असावं, ही माझी जबाबदारी आहे.” तसेच त्यांनी प्रत्येक ठाणेकर नागरिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. ठाण्याच्या ओळखीबाबत बोलताना त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. “ठाणे हे केवळ इमारतींचं शहर नाही, तर त्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या वारशाचं जतन होणं अत्यंत आवश्यक आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे,” असे ते म्हणाले. कार्यक्रमात उपस्थित विकासक आणि नागरिकांनी केळकर यांच्या भूमिकेचे स्वागत केले. ठाण्यात वाढत असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेली ही ठाम भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
















































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.