loader
Breaking News
Breaking News
Foto

माजगाव येथे २४ एप्रिलला विक्रांत सावंत यांच्या पुढाकाराने मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी आणि माजगाव ग्रामस्थांच्या वतीने इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे' आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा शुक्रवार, २४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, माजगाव येथे होणार आहे. ​शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि जि. प. सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेपूर्वी सराव व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​ही परीक्षा सकाळी ७:३० ते १०:३० या वेळेत पार पडेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 'शिक्षण हेच विकासाचे मुख्य सूत्र' मानून हा शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg