खेड (प्रतिनिधी) - पालघर ते कुंभवे दरम्यान राज्यमार्गावर १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडे आठ वाजता झालेल्या अपघातात कल्पेश प्रकाश आदावडे (वय ३५, मूळ राहणार चिखलगाव, तालुका दापोली) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर विलास पांडुरंग मोहिते (वय ४८, राहणार मंडणगड) हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी वाडीत असलेल्या लग्नासाठी कल्पेश आदवडे हे शनिवारी (१८ एप्रिल) रात्री १२ च्या सुमारास विरार येथून स्वतःची दुचाकी घेऊन गावाकडे निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांनी इंदापूर येथे साधारण एक तास विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढील प्रवासाला सुरुवात केली. पहाटेच्या 8:15 सुमारास मंडणगड येथील चिंचाली धरणाच्या पुढे आणि कुंभवे गावाच्या आधी असलेल्या एका वळणावर कल्पेश यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीच्या खालील बाजूस असलेल्या खोल खड्यात कोसळली.
हा अपघात इतका भीषण होता की, कल्पेश यांच्या डोक्याच्या मागील बाजूस असलेल्या दगडाचा जबर मार लागला. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. कल्पेश यांच्यासोबत दुचाकीवर मागे बसलेले विलास मोहिते हे या अपघातातून थोडक्यात बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. लग्नाच्या उत्साहात असलेल्या कुटुंबावर कल्पेशच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक तरुण आणि मनमिळाऊ मुलगा गमावल्यामुळे परिसरात आणि त्यांच्या मित्रपरिवारात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
















































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.