loader
Breaking News
Breaking News
Foto

आरटीओ चलानाचा दंडाच्या कारवाईचे नाव पुढे करीत ठाण्यात 61 वर्षीय जेष्ठ नागरिकांची 20 लाखाची फसवणूक

ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यातील एका वृद्धाची 20 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना ठाण्यात समोर आली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 21 मार्च रोजी ठाण्यात माजिवडा परिसरात राहणाऱ्या 61 वर्षीय जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त यांना "तुमच्या वाहनावरील आरटीओ चलानाचा दंड प्रलंबित असून हा दंड त्वरित न भरल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल", असा बनावट मॅसेज मोबाईलवर पाठवून सायबर चोरट्यांनी पाठविला. तसेच या मेसेजमध्ये दंडाची रक्कम भरण्यासाठी एक लिंक देखील दिलेली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर लिंक ज्येष्ठ नागरिकाने उघडताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्यातून 13 एप्रिल रोजी 19 लाख 99 हजार 21 रुपये, तर 14 एप्रिल रोजी 17 हजार रुपये अशी एकूण 20 लाख 16 हजार 21 रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेतली. हा प्रकार लक्षात येताच तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने बँकेत धाव घेत तक्रार नोंदवली. तसेच सायबर फसवणुकीची ऑनलाईन तक्रारही दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg