सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी सुष्मिता जाधव यांची निवड होऊन दिड महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी, जिल्हा परिषदेने त्यांना अद्याप शासकीय वाहन उपलब्ध करून दिलेले नाही. या उदासीनतेबद्दल सामाजिक कार्यकर्ते गुंडू जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर तळवडे पंचायत समिती सदस्य सुष्मिता जाधव यांची निवड झाली आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना तात्काळ वाहन उपलब्ध करून देणे ही जिल्हा परिषद प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र, दोन महिने उलटूनही ही सोय करण्यात आलेली नाही.
याबाबत बोलताना गुंडू जाधव म्हणाले की, "सभापतीपदी महिला विराजमान झाल्यानंतर नवीन गाडीची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहन उपलब्ध करून देणे आवश्यक होते. प्रशासन नवीन गाडी येणार असल्याचे सांगत असले, तरी तोपर्यंत सभापतींनी प्रवास कसा करावा? जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (CEO) या विलंबाबाबत स्पष्टीकरण द्यावे, आणि ही प्रशासकीय जबाबदारी तातडीने पार पाडावी," अशी मागणी त्यांनी केली आहे. महिला सभापतींना शासकीय कामासाठी फिरताना वाहन नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने चौकशी व कार्यवाही करावी, असेही जाधव यांनी म्हटले आहे.
























































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.