देवळे (प्रकाश चाळके) - एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प संगमेश्वर (देवरुख) अंतर्गत वांद्री बीटच्या वतीने ओझरखोल अंगणवाडी येथे पोषण पखवडा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बालकाचे पोषण आणि आरोग्य तसेच सर्वांगिण विकास यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ देवरूखचे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रथमेश इंगवले, तसेच जिल्हा परिषद सदस्या माधवी गिते व वांद्री बीटच्या सुपरवायझर कांबळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना इंगवले यांनी 0 ते6 वर्षामध्ये बालकाचा विकास हा झपाट्याने होत असतो. तसेच 1000 दिवस बाळाचे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच 9 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधित या कालावधित राबविल्या जाणाऱ्या पोषण पखवडा या कार्यक्रमामध्ये पहिली सहा वर्षे यामध्ये मुलांच्या मेंदूचा विकास अत्यंत जलदगतीने होत असतो, तसेच किशोरी मुली, गरोदर स्त्रिया, स्तनदामाता यांच्या ही आरोग्याकडे शासनाने विशेष लक्ष दिले आहे. तसेच जिल्हापरिषद सदस्या माधवी गिते यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. वांद्री बीटमध्ये नेहमीच असे उपक्रम राबविले जातात. याबाबत बीटच्या सुपरवायझर कांबळे तसेच बीटमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे कौतुक केले.
तसेच खेळजत्रा उपक्रमा अंतर्गत 3 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी असलेले खेळ तसेच 3 वर्षाखालील मुलांसाठी खेळ घेण्यात आले. यावेळी सुपरवायझर कांबळे यांनी उपस्थित पालकांना त्या खेळाचे महत्व मुलांच्या वाढीसाठी कसे उपयुक्त आहे. त्यांचा खेळाच्या माध्यमातून विकास होत असतो याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्क्रिन टाईम कमी करून पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर कमी करावा व मुलांसाठी वेळ देवून त्यांच्या बरोबर असे खेळ घ्यावेत व अंगणवाडीतही खेळातून शिक्षण अंगणवाडी सेविकेने कशा प्रकारे घयावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूपासून पाककृती तयार करून त्यापासून होणारे फायदे याबाबत पालकांना मार्गदर्शन केले. तसेच अंगणवाडी सेविका, समिक्षा सचिन सावंत यांनी 1000 दिवस (एक हजार दिवस) बाळाचे याबाबत पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मेंदूच्या विकासाबाबत जिया विरेंद्र सुतार व प्राजक्ता देवलाटकर यांनी कृतीतून दाट जाळे आणि विरळ जाळे याबाबत मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम पोषण पखवडा पुरता मर्यादित न ठेवता विशेष प्राविण्य मिळवलेल्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये वांद्री बीटच्या सुपरवायझर कांबळे यांना आदर्श सुपरवायझर हा पुरस्कार 2025-26 मध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून हा पुरस्कार मिळाला. म्हणून वांद्री बीटमधील सर्व सेविका व मदतनीस यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 2025-26 चा बीटमधील आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार शिल्पा केळकर वांद्री अंगणवाडी व वांद्री अंगणवाडीतील मदतनीस प्राची नागवेकर यांना मिळाला म्हणून बीटतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कॅन्सरसारख्या रोगावर मात करून पूर्णपणे बचाव झालेल्या महिलांचाही सत्कार करण्यात आला. ओझरखोल येथील नासा इस्त्रोभेटीसाठी निवड झालेली आरोही दिनेश सावंत तसेच पोलीस दलात निवड झालेली आकांक्षा नथुराम जठ्यार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक सुलोचना सावंत तसेच पालकवर्गामधून प्रज्ञा लाकडेकर तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना तसेच किशोरी मुली यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. बीटतर्फे हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अंगणवाडी सेविका सुजाता-पातेरे यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार वांद्री बीटच्या बीटप्रमुख उर्मिला सावंत यांनी मानले.
















































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.