loader
Breaking News
Breaking News
Foto

पुस्तकी ज्ञानापलीकडचे शिक्षण! चिखलगावच्या चिमुरड्यांनी पेलले २०० मित्रांच्या 'चुलीचे' शिवधनुष्य

दापोली (सागर गोवळे) - "शिक्षण म्हणजे केवळ चार भिंतींतील धडे नव्हेत, तर संकटावर मात करण्याची जिद्द आणि समूहाचा विचार करणे होय," याचा प्रत्यय लोकसाधना संचलित शिवानीर्मल मुलांचे व लिलावती मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दिला. आगामी वर्षातील इंधनाचा प्रश्न ओळखून इयत्ता ८ वी आणि ९ वीच्या मुला-मुलींनी श्रमदानातून सरपणाची बेगमी करत एक आदर्श घालून दिला आहे. पुढील शैक्षणिक वर्षात वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या २०० वर पोहोचणार आहे. एकीकडे जूनमध्ये येणारा पावसाळा, दुसरीकडे गॅसचा तुटवडा आणि लाकडांचे गगनाला भिडलेले भाव अशा तिहेरी संकटाने वसतिगृह प्रशासनासमोर मोठा प्रश्न उभा केला होता. 'पुढच्या वर्षी जेवण कसं शिजणार?' हा प्रश्न केवळ शिक्षकांचा न राहता तो मुलांचाही झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवारी सुट्टीचा आनंद खेळण्यात न घालवता, या चिमुकल्या हातांनी कामाची धुरा सांभाळली. सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत मुलांनी जंगलातून वाळलेली फाटी (सरपण) गोळा केली. केवळ लाकूड गोळा केले नाही, तर ते गाडीत भरून सुरक्षितपणे वसतिगृहापर्यंत पोहोचवले. विशेष म्हणजे, पुढचा संपूर्ण पावसाळा निर्विघ्नपणे जाईल इतका साठा या मुलांनी अवघ्या सहा तासांच्या परिश्रमात जमा केला. आजच्या काळात मूल्यशिक्षण केवळ पुस्तकात उरले असताना, लोकसाधनाच्या या मुलांनी 'ऐकी हेच बळ' आणि 'श्रमप्रतिष्ठा' या मूल्यांचे जिवंत दर्शन घडवले. "जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा त्याचे उत्तर शोधण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे म्हणजेच खरे शिक्षण. आज या मुलांनी दाखवून दिले की, हे छोटे हात केवळ स्वतःचा नाही तर आपल्या २०० मित्रांच्या पोटाचा विचार करू शकतात."

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg