loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील श्री देव विठ्ठल मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. अशोकराव मयेकर यांची निवड

रत्नागिरी - रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे भूतपूर्व नगराध्यक्ष श्री. अशोक पुंडलिक मयेकर यांची सर्वानुमते निवड झाली. त्यावेळी सर्व उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन त्यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी संस्थेची नवीन कार्यकारिणी देखील निवडण्यात आली. अक्षय्य तृतियेच्या मुहूर्तावर रवि. दि. 19 एप्रिल 2026 रोजी श्री विठ्ठल मंदिर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत श्री. अशोक पुंडलिक मयेकर यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच नवीन कार्यकारिणीची देखील यावेळी निवड करण्यात आली, ती पुढील प्रमाणे - अध्यक्ष - श्री. अशोकराव मयेकर, उपाध्यक्ष - श्री. आनंद मराठे, कार्यवाह - श्री. राजनशेठ फाळके, कोषाध्यक्ष - श्री. प्रमोदशेठ रेडीज, सहकार्यवाह - श्री. प्रवीण हेळेकर, सदस्य - सर्वश्री - श्री. विजय पेडणेकर, श्री. शेखर पिंपुटकर, सौ. सवी संतोष कुलाबकर, श्री. पराग तोडणकर, श्री. स्वप्नील पांचाळ, श्री. रविंद्र साखरपेकर आदींची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री. अशोक मयेकर हे रत्नागिरीचे भूतपूर्व नगराध्यक्ष असून प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होताच त्यांचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. या सभेचे अध्यक्षपद रत्नागिरीतील सुप्रसिध्द विधीज्ञ अ‍ॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये यांनी भुषविले. यावेळी रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष श्री. समीर तिवरेकर, ज्येष्ठ नगरसेवक श्री. राजेश तोडणकर, रत्नागिरीच्या भूतपूर्व नगरसेविका सौ. अश्विनी मयेकर, श्री. मंदार मयेकर, श्री. पराग हेळेकर, श्री. संजय शिंदे, श्री. अवधूत शेट्ये, श्री. संकेत मयेकर, श्री. राधाकृष्ण कीर, दिपाली सावंत, श्री. दिनेशशेठ वेल्हाळ, श्री. अभिजित आंग्रे आदी अनेक सभासद उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

रत्नागिरीचे भूतपूर्व लोकप्रिय नगराध्यक्ष श्री. अशोकराव मयेकर यांची रत्नागिरीतील पुरातन श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. रत्नागिरीतील श्रीराम मंदिर देवस्थानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांनीही त्यांचे अभिदंन केले. त्यांनी सांगितले, ‘‘श्री. अशोकराव मयेकर हे लोकप्रिय नगराध्यक्ष म्हणून ओळखले जात असत. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा असून त्यांच्यासारख्या नेत्याची निवड झाली ही समाधानाची बाब आहे. त्यांना आम्हा सर्वांच्या शुभेच्छा’’ अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg