सावंतवाडी (प्रतिनिधी) - निसर्गाच्या छटा, माणसांचे भावबंध, कौटुंबिक व्यवस्था, श्रद्धा आणि विज्ञान अशा अनेक रंगछटानी बहरलेल्या एकाहून एक सरस कथांनी आरवलीतील कथाकथनाचा कार्यक्रम रंगला. दीड तासाच्या या कार्यक्रमाने रसिकांना गंतवून टाकले. असे दर्जेदार कार्यक्रम सातत्याने आयोजित करणाऱ्या साहित्य कट्ट्याला सागरतीर्थ रहिवासी शरद परूळेकर कुटुंबियांनी उत्स्फूर्तपणे ध्वनीव्यवस्था देणगी म्हणून जाहीर केली. आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग मासिक सहासष्ठाव्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आरवली येथील हॉटेल माहेर सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक करून एक रुपककथा सांगितली. त्यानंतर सरोज रेडकर यांनी सुधा मूर्ती लिखित 'अति तिथे माती' ही कथा कथन केली. ही कथा मोबाईलच्या दुष्परिणामांवर आधारित होती. विनय सौदागर लिखित "विभूती' ही जातीव्यवस्थेवर प्रहार करणारी कथा दिलीप पांढरे यांनी; तर 'चोर कोण?' ही संभावित लबाडीवर आधारलेली कथा एकनाथ शेटकर यांनी सांगितली. व.पु.काळे लिखित 'शोध' व 'हसरे दुःख' या प्रसिध्द कथा अनुक्रमे स्नेहा नारिंगणेकर व राजेश वैज यांनी संक्षिप्त स्वरूपात सांगितल्या. अरुण धर्णे यानी 'जीवनचक्र' ही बाष्पीभवनाच्या ऋतुचक्रावर आधारित स्वरचित विज्ञानकथा; तर रवींद्र पणशीकर यानी 'गुंता' ही अनुभवेली सत्यकथा सांगितली.
शेखर पणशीकर यानी चिं.त्र्यं. खानोलकर लिखित 'देवाची आई'; तर भालचंद्र दीक्षित यानी पु.ल. देशपांडे लिखित ' म्हैस' ही कथा संक्षिप्त स्वरूपात सांगितली. शेवटी कमलेश अणावकर लिखित 'आजी' ही कथा ॲड. श्रद्धा राऊळ यानी कथन केली. प्रेक्षक म्हणून आलेल्या शोभना आरोलकर यांनी स्वामी श्रद्धेवर बेतलेली स्वानुभवाची 'हरवले ते गवसले' ही कथा कथन करून या कार्यक्रमाची सांगता केली. सुनंदा परुळेकर, अरविंद आरोलकर, गंगाराम सामंत, विनायक उमर्ये, रामचंद्र बेहेरे, गिरीधर राजाध्यक्ष, निलिमा राजाध्यक्ष, अनिता सौदागर, धिरज कांबळे, विशाल उगवेकर, सोमा गावडे,जयदीप देशपांडे, मोहन देसाई आणि अविनाश जोशी आदी रसिक उपस्थित होते. माहेर हाॅटेल चे व्यवस्थापक काशिनाथ नाईक यांचे कार्यक्रमाला उत्तम सहकार्य लाभले.
























































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.