loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणकन्या तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस’ची विजेती!

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा शंभर दिवसांचा खेळ अखेर पूर्ण झाला आहे. यावर्षी तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद या पाच सदस्यांनी टॉप-५ मध्ये एन्ट्री घेतली होती. या पाचही जणांना संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून व्होटिंग करण्यात आलं. मात्र, अखेरीस या खेळात तन्वी कोलतेने बाजी मारली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती ठरली आहे तन्वी कोलते. तर राकेश बापट यंदाच्या सीझनचा उपविजेता ठरला आहे. तन्वीला हा शो जिंकल्यावर ‘बिग बॉस मराठी’कडून ट्रॉफी आणि १५ लाखांचा चेक देण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

यंदाच्या पर्वात ‘बिग बॉस मराठी’च्या घरात प्रेक्षकांना ‘काटा’ आणि ‘टोळी’ असे दोन ग्रुप्स पाहायला मिळाले होते, आणि तन्वीने हा शो जिंकल्यामुळे ‘काटा ग्रुप’ने या खेळात बाजी मारली आहे. ग्रँड फिनालेला आधी शोमधून एलिमिनेट झालेले सदस्य सुद्धा उपस्थित होते. तसेच ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या निमित्ताने यावर्षी ग्रँड फिनालेला जिनिलीया देशमुख व अभिषेक बच्चन हे दोन लोकप्रिय बॉलीवूड कलाकार देखील उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg