loader
Breaking News
Breaking News
Foto

सासोली हेदूसवाडी येथे एस.टी. बस व मोटारसायकलचा अपघातात, वयोवृद्ध इसमाचा जागीच मृत्यू

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते बांदा मार्गावर रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सासोली हेदूसवाडी येथे इब्रामपूर तिठ्यावर पणजी उस्मानाबाद धाराशिव एस.टी. बस तसेच मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील वयोवृद्ध दिलीप हळदणकर वय वर्षे ५५ यांचे जागीच निधन झाले. मोटारसायकलला वाचवण्यासाठी बस चालकाने ब्रेक लावला तरी बस मोटार सायकलला धडकून रस्ता कडेला असलेल्या दुकानाला धडकली. अपघाताची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिलीप हळणकर यांच्या अपघाती निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दोडामार्ग पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू होता. दोडामार्ग ते बांदा मार्गावर पणजी येथील पणजी धाराशिव एस.टी. बस क्रमांक एम. एच. १४ बी. ०९१६ घेऊन चालक राहुल अंकीत कोल्हापूर हा बस घेऊन जात होता. याच दरम्यान हेदूसवाडी इब्रामपूर तिठ्यावर कुडासे वानोशी येथील रहिवासी दिलीप हळदणकर हे मोटार सायकल जी. ए. ०३ ए. ८३७३ घेऊन मुख्य रस्त्यावर येत असताना पणजी धाराशिव बस चालक याच्या निदर्शनास येताच बस चालकाने ब्रेक लावून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण मोटार सायकलला धडक बसून काही अंतर फरफटत जाऊन रस्ता कडेला असलेल्या दिपक गवस यांच्या दुकानाला धडक बसली. मोटारसायकल वरील वयोवृद्ध दिलीप हळदणकर यांचे जागीच निधन झाले.

टाइम्स स्पेशल

सासोली हेदूसवाडी येथे अपघात झाल्यानंतर कुडासे-वानोशी येथील नागरिक मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वाना बसमधून बाहेर काढले. या बसमधून कोल्हापूर, पंढरपूर, धाराशिव दरम्यान जवळपास चौदा प्रवासी होते. अपघातात मृत्यू झालेले दिलीप हळदणकर आपल्या मनोरुग्ण पत्नीसोबत राहत होते, आपल्या पत्नीची देखभाल करत होते. पण त्यांच्या निधनामुळे पत्नीची सेवा कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.सासोली हेदूसवाडी येथे झालेल्या अपघातामुळे दोडामार्ग बांदा वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. अपघात माहिती मिळताच सावंतवाडी एस.टी. आगाराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोडामार्ग पोलीस घटनास्थळी पंचनामा करत होते, तर बस मधील प्रवाशांना दुसर्‍या बसने पुढील प्रवासासाठी पाठवण्याची व्यवस्था सुरू होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg