पनवेल - आठवड्याचा पहिला दिवस आणि ऑफिसला जाणाऱ्यांची लगबग असतानाच पनवेल रेल्वे स्थानकात मोठी दुर्घटना घडली. पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली. ४ प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर लिफ्ट कोसळल्याची माहिती मिळाली आहे. पहाटेची वेळ होती, लांब पल्ल्याच्या गाड्या येत जात होत्या. प्रवाशांची गर्दी स्थानकात होती. ही लिफ्टवरुन खाली येत असताना कोसळली. चार प्रवासी अडकले असून त्यांना रेस्क्यू केलं जात आहे. एकंदरीतच रेल्वे प्रवाशांसाठी बसवण्यात आलेल्या लिफ्ट या नादुरुस्त किंवा मेंटेन केल्या जात नाहीत हे या निमित्ताने पुन्हा निदर्शनास आलं आहे.
पनवेल हे वर्दळीचं ठिकाणी आहे. तिथे लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल शिवाय मेमू ट्रेन्स देखील जात असतात. त्यामुळे या स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसला जाण्याची देखील गर्दी प्रवाशांची होत असतानाच ही मोठी दुर्घटना प्लॅटफॉर्म नंबर ७ वर घडली आहे. लिफ्ट कोसळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाली आहे. लिफ्ट कोसळल्या प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. लिफ्ट कशी कोसळली यामागचं कारण अद्याप समजू शकलं नाही. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दुर्घटना घडल्याने भीतीचं वातावरण आहे.
















































































































2.jpg)





























.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.